देशात कोरोनाचा कहर हा दिवसेंदिवस वाढत चालला आहे. एक वर्ष उलटून गेले तरी अद्यापही कोरोनाचा उद्रेक दिवसेंदिवस वाढत असल्याचे पाहायला मिळत आहे. आरोग्य मंत्रालयाच्या हवालानुसार देशात गेल्या २४ तासात १ लाख ६१ हजार जणांना कोरोनाची लागण झाली असून सध्याच्या घडीला १२ लाख ६४ हजार ६९८ अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. १८ ऑक्टोबरपासूनचा हा उच्चांकी आकडा आहे.
India reports 1,61,736 new #COVID19 cases, 97,168 discharges and 879 deaths in the last 24 hours, as per Union Health Ministry
Total cases: 1,36,89,453
Total recoveries: 1,22,53,697
Active cases: 12,64,698
Death toll: 1,71,058Total vaccination: 10,85,33,085 pic.twitter.com/ndxnchFoIp
— ANI (@ANI) April 13, 2021
देशात आतापर्यंत १ कोटी २२ लाख ५३ हजार ६९७ करोना रुग्ण उपचारानंतर बरे झाले आहेत. तर १ लाख ७१ हजार ५८ जणांचा मृत्यू झाला आहे. दरम्यान देशात १० कोटी ८५ लाख ३३ हजार ८५ जणांचं लसीकरण झालं आहे.त्यामुळे दिवसेंदिवस रुग्णांच्या संख्येत वाढ होताना दिसत आहे.