भारतातील कोरोनाग्रस्तांचा आकडा वाढला असून रुग्णांची एकूण संख्या एक कोटीवर पोहोचली आहे. कोरोना व्हायरसचा धोका हा दिवसेंदिवस वाढत आहे. जगभरातील कोरोनाग्रस्तांची संख्या ही ११ कोटींच्या वर गेली असून लाखो लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. त्यानंतर आता देशातही कोरोनामुळे गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. कोरोनाचा विस्फोट झाला असून देशातील रुग्णसंख्येत विक्रमी वाढ झाली आहे.
कोरोनाग्रस्तांच्या संख्येत झपाट्याने वाढ झाली असून चिंता वाढवणारी आकडेवारी पुन्हा एकदा समोर आली आहे. गेल्या २४ तासांत देशभरात कोरोनाचे तब्बल ३५,८७१ नवे रुग्ण आढळून आले आहेत. तर १७२ लोकांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. तब्बल १०१ दिवसांत ही मोठी वाढ झाली आहे.
देशात लसीकरणाच्या मोहिमेला सुरुवात झाली असून आतापर्यंत लाखो लोकांनी लस घेतली आहे. काही राज्यांमध्ये कोरोना रुग्णांच्या संख्येत मोठा वाढ होत असल्याने प्रशासनाच्या चिंतेत भर पडली आहे.
महाराष्ट्र, पंजाब, केरळ, तामिळनाडू, पश्चिम बंगाल आणि छत्तीसगडमधील कोरोना रुग्णांची संख्या सर्वाधिक आहे. जवळपास ८२ टक्के नवीन केसेस या सहा राज्यांशी संबंधित आहेत.