उत्तर प्रदेश । उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ अनेक विषयावरून अनेकदा चर्चेत असतात. यावेळी त्यांनी पत्रकाराला केलेल्या शिवीगाळामुळे पुन्हा एकदा चर्चेत आले आहे. सध्या या शिवीगाळ केलेला व्हीडिओ सोशल मीडियावर चांगलाच वायरल होताना दिसत आहे.
सदर व्हिडीओ एका वृत्तसंस्थेच्या प्रतिनिधीशी बोलत असतानाच असून, चिडलेल्या आदित्यनाथ यांनी समोरील व्यक्तीला शिवी दिल्याचा आरोप केला जात आहे. समोरच्या व्यक्तीबद्दल अपशब्द वापरल्याने योगींवर टीकाही होत आहे.
देशात करोना लसीकरण वेगाने सुरू आहे. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी रविवारी लसीचा पहिला डोस घेतला. त्यानंतर ते एका वृत्त संस्थेशी बोलत होते. प्रतिक्रिया देत असतानाच कॅमेरा हलल्याने योगी आदित्यनाथ चिडले आणि त्यांनी व्हिडीओ पत्रकाराला शिवी दिली.
निवृत्त आयएएस अधिकाऱी सूर्य प्रताप सिंह यांनी हा व्हिडीओ ट्वीट करत टीका केली आहे. ‘उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा हा आहे खरा चेहरा. थोडा आवाज झाला म्हणून कॅमेरामॅनला शिवी देत आहे. असो यांच्या सोबत असंच व्हायला हवं. देशातील सर्वात मोठी वृत्तसंस्था जेव्हा सरकारी प्रवक्त्यांपेक्षाही जास्त पुढे पुढे केल्या असं होणं साहजिक आहे. संताची भाषा ऐका,’ असे सूर्य प्रताप यांनी म्हटले आहे.
ये है अजय बिस्ट का असली चेहरा,
—एनएनआई के पत्रकार को कैमरे पर गाली;साधू के वेश में नज़र आते इन तथाकथित “योगी” के मस्तिष्क में पनपती इस अमर्यादा, अशालीनता एवं शाब्दिक निम्नता से बीजेपी बेशक गौरवान्वित महसूस करें पर राष्ट्र शर्मिंदा और शर्मसार हुआ है।
ये बीजेपी का असली चेहरा है। pic.twitter.com/tisg6AgONA
— MumbaiYouthCongress (@IYC_Mumbai) April 5, 2021