बर्फ आठवला कि सगळ्यांच्या नजरेसमोर येतात आइसक्रीम, कोल्डड्रिंक, इत्यादि थंड पदार्थ. मात्र याव्यतिरिक्तही बर्फाचा वापर अनेक गोष्टीसाठी केला जातो, माहित नसेल तर जाणून घ्या बर्फाचा कोणकोणत्या गोष्टीसाठी उपयोग केला जातो.
बर्फाचे माहिती नसलेले उपयोग –
१) कडू औषध खाण्याआधी तोंडामधे बर्फ ठेवल्याने औषध कडू लागणार नाही.
२) शरीरावर कुठे जखम झाली असेल आणि त्या भागतून रक्त वाहने थांबत नसेल तर त्यावर बर्फ लावल्याने रक्त वाहने लगेच थांबते.
३) पायांच्या टाचामधील दुखणे दूर करण्यास बर्फ फायदेशीर आहे.
४) जास्त जेवण झाल्यावर अपचन झाल्यासारखे वाटत असेल तर बर्फ खाल्याने पचनास मदत होते.
५) उलटयाचा त्रास होत असेल तर बर्फ चोखावा, लगेच उलट्या येणे बंद होणार.
बर्फाचे इतर फायदे-
उन्हाळ्यात अनेकाना घामोळ्याचा त्रास होतो. बर्फाने मसाज केल्याने शरीराचे तापमान कमी होऊन घामोळ्या कमी होतात. त्वचेवरील काळे डाग कमी करण्यासाठी बर्फाचा वापर केला जातो. चेहऱ्यावर बर्फ फिरवल्याने त्वचेवरील रक्तभिसरण वाढण्यास मदत होते. यामुळे त्वचा उजळ होण्यास मदत होते. नियमित बर्फाने मसाज केल्याने चेहऱ्यावरील तेलकटपना तसेच डेड सेल्स कमी होतात. बर्फाने चेहऱ्यावर मसाज केल्यास त्वचेवरील बैक्टीरिया कमी होऊन पिंपल्स येणे कमी होतात. नियमित बर्फाने मसाज केल्याने त्वचेतील ओलावा टिकून राहून त्वचा सॉफ्ट होते. बर्फाचे असे इतर फायदे देखील आहेत. त्यामुळे वेळ न घालवता लगेच बर्फाचे हे उपयोग करून पहा..