बँकाच्या विलनीकरणाच्या घोषणेनंतर आता अनेक बँकांचे चेकबुक, पासबुक आणि आयएफएससी कोडमध्ये मोठे बदल होणार आहेत. देना बँक, विजया बँक, कॉर्पोरेशन बँक, आंध्रा बँक, ओऱिएंटल बँक ऑफ कॉमर्स, यूनायटेड बँक आणि इलाहाबाद बँक या सात बँकांच्या ग्राहकांना एक एप्रिलपासून होणाऱ्या या बदलांचा फटका बसू शकतो. त्यामुळे या संदर्भात बँकांकडून ग्राहकांना लवकरात लवकर माहिती जाणून घ्यावी लागेल.
एक एप्रिल २०२१ पासून अनेक बँकांची जुने चेकबुक आणि आयएफएससी कोड निष्क्रीय होणार आहेत. जर या सता बँकांपैकी कोणत्याही बँकेमध्ये खातं असणाऱ्या ग्राहकांनी त्यांच्या बँक शाखेशी संपर्क करुन नव्या चेकबुक आणि आयएफएससी कोडसंदर्भात माहिती घेणं फायद्याचं ठरेल.बदलेला कोड ग्राहकांना माहिती असल्यास ऑनलाइन व्यवहार करताना ग्राहकांना काही अडचणी येणार नाहीत.